राहुरी शहर जनरल व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी स्वप्निल कासार यांची निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहर जनरल व्यापारी असोसिएशनच्या अध्यक्षपदी स्वप्निल कासार यांची निवड

( राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी शहर स्टेशनरी, जनरल, कॉस्मेटिक आणि झेरॉक्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी...

(राहुरी : श्रेयस लोळगे)



राहुरी शहर स्टेशनरी, जनरल, कॉस्मेटिक आणि झेरॉक्स असोसिएशनची सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या वेळी नेवासा येथील दुर्दैवी आगीत मृत्यूमुखी पडलेल्या व्यापारी रासने यांच्या  कुटुंबातील पाच बांधवांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

अध्यक्ष अनिल भट्टड यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत सचिव आप्पासाहेब सरोदे यांनी गेल्या पाच वर्षांत राबवलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कोषाध्यक्ष युवराज चव्हाण यांनी संस्थेचा आर्थिक ताळेबंद सादर केला.

यावेळी जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाल संपुष्टात आल्यानंतर नवीन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली. असोसिएशनच्या अध्यक्षपदी स्वप्निल कासार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांच्या सोबत उपाध्यक्षपदी सिद्धार्थ रासने, सचिवपदी आप्पासाहेब सरोदे, खजिनदारपदी युवराज चव्हाण, तर संपर्कप्रमुखपदी मधुकर घाडगे यांची निवड झाली.


नवनिर्वाचित अध्यक्ष मा. श्री. स्वप्निल कासार यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "सर्व सभासदांनी एकमताने माझ्यावर टाकलेला विश्वास माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. सर्व व्यापारी बांधवांच्या हितासाठी असोसिएशनच्या माध्यमातून नव्या योजना व उपक्रम राबवले जातील. सर्वांना सोबत घेऊन संघटनेच्या कार्यात पारदर्शकता व प्रगती जपली जाईल."

या बैठकीत नवनिर्वाचित कार्यकारिणीचे सर्व व्यापारी बांधवांकडून स्वागत व अभिनंदन करण्यात आले. आभारप्रदर्शन मधुकर घाडगे यांनी केले.

यावेळी अनिल भट्टड,सिद्धार्थ रासने, मधुकर घाडगे,युवराज चव्हाण,आप्पासाहेब सरोदे,किरण पवार,पारस जैन,राजेश उपाध्याय,रविभाऊ जाधव,अमर कुंभकर्ण, श्री. मुकुंद कोळपकर,प्रकाश इंगळे,नवनाथ पवार,महेश राका, किशोर निंगुणकर,रेहान शेख व इतर व्यापारी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत