देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे "श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र" चा २२ वा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे "श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र" चा २२ वा वर्धापन दिन मोठ्या भक्तिभावात व उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी केंद्रात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी स्वामी समर्थांच्या नामजप व आरती संपन्न झाली. गणेगाव येथील विठ्ठल महाराज कोबरणे यांनी स्वामी चरित्र निरुपण केले. अनेक श्रद्धाळू भक्तांनी या सर्व कार्यक्रमात सहभाग घेऊन दिवसभर अध्यात्मिक वातावरण अनुभवले.
यावेळी स्थानिक नागरिक, सेवाभावी कार्यकर्ते आणि स्वामी समर्थ सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. वर्धापन दिनानिमित्त महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते, ज्याचा लाभ अनेक भक्तांनी घेतला.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत