बेलापूर सोसायटीचे चेअरमन कै.विलास गंगाधर मेहेत्रे यांचे दुःखद निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बेलापूर सोसायटीचे चेअरमन कै.विलास गंगाधर मेहेत्रे यांचे दुःखद निधन

(वेबटीम : बेलापूर) बेलापूर बु. (ता. श्रीरामपूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि समाजाभिमुख कार्यकर्ते कै. विलास गंग...

(वेबटीम : बेलापूर)


बेलापूर बु. (ता. श्रीरामपूर) येथील विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे विद्यमान चेअरमन आणि समाजाभिमुख कार्यकर्ते कै. विलास गंगाधर मेहेत्रे(वय ६८)यांचे १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने बेलापूर गावात शोककळा पसरली आहे.

विलास नाना मेहेत्रे हे वारकरी संप्रदायाशी निष्ठा ठेवणारे, अत्यंत धार्मिक आणि साधेपणाने जीवन जगणारे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील योगदानामुळे ते गावकऱ्यांमध्ये ‘आपलेसे’ मानले जात होते.

ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय स्वयंसेवक होते आणि संघाच्या विचारसरणीचा त्यांनी जीवनभर अंगीकार केला होता. बेलापूर गावाच्या विकासासाठी आणि समाजहितासाठी त्यांनी अनेक उपक्रम हाती घेतले होते.

त्यांच्या अचानक जाण्याने गावात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि. २६ ऑगस्ट रोजी सकाळी ८:०० वाजता नावघाट,प्रवरतीरी बेलापूर बुद्रुक या ठिकाणी होणार आहे.

कृषि व फुले व्यावसायिक सर्वश्री सुरेश, अशोक आणि वसंत मेहेत्रे यांचे ते बंधु तर बेलापूर बुद्रुक ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच श्रीमती विमलबाई मेहेत्रे यांचे ते पती होत.

त्यांच्या पश्चात तीन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, दोन मुले,पुतणे, सुना,भाचे, भाचे सुना,नातवंडे असा मोठा परिवार आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत