देवळाली प्रवरा नगपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी पालिकेस निवेदन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

देवळाली प्रवरा नगपरिषदेचे सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे विविध मागण्यांसाठी पालिकेस निवेदन

देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज २६ ऑगस्ट ...

देवळाली प्रवरा(वेबटीम)




राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील नगपरिषदेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी आज २६ ऑगस्ट रोजी देवळाली प्रवरा नगरपरिषदेस निवेदन देण्यात आले आहे.


देवळाली प्रवरा नगपरिषदेत  विविध पदांवर कार्यरत असलेले कर्मचारी गेल्या ७ ते ८ वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाले आहेत. परंतु आजतागायत कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्त वेतन व रजा रोखीकरणाची रक्कम मिळालेली नाही.


शासन नियमांनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन, रजा रोखीकरण व इतर आर्थिक हक्क वेळेत देणे बंधनकारक असताना कर्मचाऱ्यांवर  अन्याय होत असल्याने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी कार्यालयीन अधीक्षक दीपक जागरवाल यांना दिले आहेत.



यावेळी सेवानिवृत्त कर्मचारी गीताराम मोरे, दत्तात्रय कदम मुकुंद ढुस, कानिफनाथ जाधव, ज्ञानदेव शेटे ,राजेंद्र थिगळे, निवृत्ती खांदे, बबन दिवे, राजेंद्र खरात भाऊसाहेब पठारे, शिवाजी पठारे, आयुब शेख महंमद शेख आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत