राहुरी पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी पोलिसांचे ऑपरेशन ऑल आऊट

राहुरी(वेबटीम)    राहुरी पोलीस स्टेशनच्या १ ते २ ऑगस्टपर्यंत ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले होते .सदर ऑपरेशन दरम्यान राहुरी पोलिसांनी एकूण 107 ...

राहुरी(वेबटीम)

  


राहुरी पोलीस स्टेशनच्या १ ते २ ऑगस्टपर्यंत ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आले होते .सदर ऑपरेशन दरम्यान राहुरी पोलिसांनी एकूण 107 समन्स , 32  बेलेबल वॉरंटची  बजावणी  व  24 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करून  एकूण 10 आरोपीना नॉन बेलेबल वॉरंटमध्ये अटक केले आहे.

यामध्ये मनोज नरहरी उदावंत (वय ५७ वर्षे,रा शिवाजी चौक राहुरी बु.ता राहुरी),सुनिल चांगदेव शेलार (वय-२५ वर्षे रा.म्हैसगाव ), सोपान रावसाहेब करमड( रा. घोरपडवाडी),सचिन उर्फ किरण दत्तु शेलार रा सोनवने वस्ती(टाकळीमियॉ ता राहुरी), आनंद लखीचंद देसरडा (रा.देवळाली प्रवरा),  राहुल कैलास जवरे (रा वांबोरी) तुषार रावसाहेब माने (रा.धामोरी) नितीन साहेबराव जंगले(रा चेडगाव),  बाबासाहेब चंद्रकांत तमनर (रा.तमनर राखाडा), किशोर भाऊसाहेब वाघुर वाघ (रा. मुलनमाथा)सदर एकूण १० आरोपींना अटक करून माननीय न्यायालयात हजर केले आहे.

   तसेच सदर ऑपरेशन दरम्यान चंद्रकला राजू शिंदे रा.डीग्रस, नवनाथ नारायण पिंपळे रा. सात्रळ , दीपक बाळासाहेब पवार रा.वांजुळपोई हे गावठी हातभट्टीची तयार दारू विनापरवाना विक्री करताना आढळून आल्याने, सदर आरोपींकडून सुमारे २०० लिटर , २० हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टीची दारू जप्त केली आहे.

  तसेच विजय उगले रा.यवतमाळ हा संशयितरित्या मोटरसायकलवर राहुरी पोलीस स्टेशन हद्दीत फिरताना मिळून आल्याने त्याला ताब्यात घेऊन, त्यावर मुंबई पोलीस कायदा कलम 124 अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

    सदर ऑपरेशन ऑल आउट ची पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत