देवळाली प्रवरा(वेबटीम) छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शनी देवगाव येथे सुरू असलेल्या श्री. गंगागिरी महाराज यांच्या १७८व्...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील शनी देवगाव येथे सुरू असलेल्या श्री. गंगागिरी महाराज यांच्या १७८व्या अखंड हरिनाम सप्ताहसाठी उद्या सोमवार दि.४ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता देवळाली प्रवरा व राहुरी फॅक्टरी येथून चपाती-भाकरी पंगत रवाना होणार आहे.
यासाठी उद्या सोमवारी सकाळी ९ वाजता देवळाली बाजारतळ व राहुरी फॅक्टरी कराळेवाडीतील हनुमान मंदिरात भाकरी व चपाती संकलित केल्या जाणार असून आमटीसाठी रोख स्वरूपात देणगी स्वीकारली जाणार आहे.
या सप्ताहानिमित्त जाण्या-येण्यासाठी वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.
तरी या कार्यात भाविकांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत