राहुरी(वेबटीम) अहिल्यानगर जिल्हा परिषदेने राहुरी तालुक्यातील 25 गावांची मियावाकी वृक्ष लागवड करण्यासाठी निवड केली असून . प्रत्येक ग्रामपंचा...
राहुरी(वेबटीम)
अहिल्यानगर जिल्हा परिषदेने राहुरी तालुक्यातील 25 गावांची मियावाकी वृक्ष लागवड करण्यासाठी निवड केली असून . प्रत्येक ग्रामपंचायतीना 5 ते 10 गुंठे जागेत वृक्षलागवड करणेस सांगितले आहे.त्यातीलच कनगर येथे राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तायडे व इतर पाहुण्यांचे हस्ते 10 गुंठे जागेत तीन हजार घनदाट झाडी मियावाकी वृक्ष लागवड करण्याचा श्री गणेशा वृक्षारोपण करून करण्यात आला .
यावेळी श्री तायडे साहेब यांनी ग्रामस्थांना मियावाकी वृक्ष लागवडी बाबत माहिती दिली.
सदर योजनेअंतर्गत ग्रामपंचायतने स्वखर्चातून किंवा लोकवर्गण्यातून एका गुंठ्यात तीनशे जंगली झाडे फळझाडे फुलझाडे या पद्धतीने लावायचे आहेत .सदर झाडे एकमेकांशी स्पर्धा करून घनदाट असे जंगल तयार होईल सध्या हा पथदर्शी प्रकल्प असून यापुढे मोठ्या प्रमाणात जंगल निर्माण करण्यासाठी मी यावाकी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्जन्यमान वाढवून दुष्काळी भागांना त्याचा फायदा होणार आहे.
यावेळी कनगरचे सरपंच सर्जेराव घाडगे, विस्ताराधिकारी श्री कोकाटे , श्री निमसे , कृषी विस्तार अधिकारी श्री अनारसे , श्री.गोमलाडू तसेच उपसरपंच बाळासाहेब गाढे, सुभाष नालकर, संदीप घाडगे, धनंजय बर्डे भाऊसाहेब आडभाई, भाऊसाहेब घाडगे ,शंकर जाधव ग्रामपंचायत अधिकारी चव्हाण, संभाजीराव निमसे , जगन्नाथ नालकर, महमद इनामदार, भारत खाटेकर यांचे सह ग्रामस्थ उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत