राहुरी शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष; प्रमुख मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना व पूजेस उत्स्फूर्त प्रतिसाद - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी शहरात गणेशोत्सवाचा जल्लोष; प्रमुख मंडळांकडून श्री गणेशाची स्थापना व पूजेस उत्स्फूर्त प्रतिसाद

(राहुरी : श्रेयस लोळगे)  राहुरी शहरातील पहिला मानाचा गणपती आझाद मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा जय फ...

(राहुरी : श्रेयस लोळगे) 

राहुरी शहरातील पहिला मानाचा गणपती आझाद मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा जय फार्माचे संचालक जय संतोष सुराणा आणि डॉ. (सौ.) सेजल जय सुराणा यांच्या हस्ते करण्यात आली.

या वेळी मंडळाचे अध्यक्ष अमृत दहिवाळकर, उपाध्यक्ष गणेश ढोले तसेच मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


राहुरी शहरतील दुसरा गणपती व्यंकटेश तरुण मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा मंडळाचे संस्थापक आणि मार्गदर्शक डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक मा. श्री.रावसाहेब(चाचा)यादवराव तनपुरे आणि राजश्री(चाची) रावसाहेब तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी युवा नेते प्रतीक तनपुरे,युवा मंचचे कांता तनपुरे, प्रफुल्ल तनपुरे, भूषण सिन्नरकर, मंडळाचे अध्यक्ष चि. प्रणव वाघ, उपाध्यक्षपदी चि.अथर्व शेजूळ आणि श्री.मंगेश बिडवे

तसेच मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



राहुरी शहरतील तिसरा गणपती मळगंगा तरुण मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा ऋषिकेश मोटे यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

अध्यक्ष-सतीश माने,उपाध्यक्ष-श्रीकांत दळवी तसेच यावेळी मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



राहुरी शहरतील चौथा गणपती बुवासिंदबाबा तरुण मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा श्री सचिन भाऊ राऊत यांच्या हस्ते संपत्नीक करण्यात आली.

यावेळी मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



राहुरी शहरतील पाचवा गणपती श्रीदत्त मित्र मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा राहुरी मेडिकलचे रवी जग्गी यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

यावेळी युवा नेते मंदार धुमाळ,मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र जगधणे , उपाध्यक्ष बंटी पवार तसेच मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




राहुरी शहरतील सहावा गजानन तरुण मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा मकरंद सातभाई यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष ऋषिकेश कोरडे,उपाध्यक्ष ओम वाघ, सोनू बलसानी मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



राहुरी शहरतील सातवा गणपती श्रीरामदत्त मित्र मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा सुवर्णकार प्रकाश दहिवाळकर आणि मीनाक्षी दहिवाळकर

यांच्या हस्ते करण्यात आली.

यावेळी युवा नेते गोपीशेठ दहिवाळकर, युवा नेते सौरभ उंडे, युवा नेते ओंकार कासार, मंडळाचे अध्यक्ष स्वप्निल कासार, उपाध्यक्ष बालू पन्हाळे तसेच मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



 राहुरी शहरातील तनपुरे गल्ली येथील जवाहर तरुण मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली ही पूजा नरेंद्र शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली.

 यावेळी मंडळाचे अध्यक्ष बंटी धनवटे उपाध्यक्ष नितीन शिंदे तसेच मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



राहुरी शहरतील कोळीवाडा येथील वाल्मिक तरुण मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा ईश्वर मासरे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मार्गदर्शक सुनील नाना पवार, मंडळाचे अध्यक्ष बंटी भागवत, उपाध्यक्ष पिंटू मासरे तसेच मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




राहुरी शहरतील श्रीराम गणेशोत्सव मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा मोठ्या उत्साहात पार पडली. ही पूजा राजेंद्र आरगडे साहेब यांच्या हस्ते सपत्नीक करण्यात आली.

यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव(दादा) पाटील सोनवणे तसेच मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




राहुरी शहरातील मठ गल्ली परिसरातील शिवछत्रपती तरुण मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा गणेश शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली.

यावेळी मंडळाचे अध्यक्ष ओंकार सिन्नरकर,किरण कुंभार तसेच मंडळाचे सर्व सदस्य, गणेशभक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.




 राहुरी शहरातील शिवाजी चौक येथील शिवाजी चौक मित्र मंडळाच्या श्री गणेशाची स्थापना व पूजा बन्नी बर्डे यांच्या हस्ते सपत्नीक पार पडली.

यावेळी मंडळाचे संस्थापक सदस्य मनोज मामा उदावंत,राजेंद्र दुधाडे,तसेच नारायण धोंगडे,अजिंक्य उदावंत,सागर उदावंत,सोमा गुजर, बालाजी उदावंत, सौरभ दुधाडे तसेच मंडळाचे सर्व सदस्य गणेश भक्त आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


या सर्व तसेच इतरही मंडळाकडून यंदाही सामाजिक उपक्रम आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, गणेशोत्सव काळात विविध धार्मिक आणि समाजोपयोगी उपक्रम राबवले जाणार आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत