राहुरी फॅक्टरी येथे उद्या बुधवारी रास्ता रोको - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे उद्या बुधवारी रास्ता रोको

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यावर वारंवार होणारे अपघात यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संता...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



अहिल्यानगर-मनमाड महामार्गाची झालेली दुरावस्था आणि त्यावर वारंवार होणारे अपघात यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर नगर-मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीच्यावतीने बुधवारी दिनांक १० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता राहुरी फॅक्टरीतील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.

 नगर मनमाड महामार्गाचे काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रोडवरील जड वाहतूक पर्यायी मार्गाने वळवावी. रोडवर पडलेले खड्डे तत्काळ बुजविण्यात यावेत. ज्याठिकाणी काम सुरू आहे त्याठिकाणी सूचना फलक, दिशादर्शक फलक लावण्यात यावेत. रोडचे काम वर्कऑर्डर, साईड गटाराचे आराखडे जनतेसाठी प्रसिद्ध करावेत आदी कृती समितीच्या मागण्या आहेत. रोडच्या झालेल्या या दुर्दशेमुळे झालेल्या अपघातात आतापर्यंत शेकडो प्रवासी व नागरिकांचे बळी गेले असून या रोडने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी जास्तीत जास्त संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत