राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील हर हर महादेव ग्रुप व राजुभाऊ शेटे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील चिंचविहीरे येथील हर हर महादेव ग्रुप व राजुभाऊ शेटे मित्रमंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत असून विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या ठिकाणी करण्यात आले आहे.
तर मंडळाचे सदस्य माहुरगड येथे ज्योत आणण्यासाठी रवाना झाले आहेत.
प्रारंभी सोमवारी 22 सप्टेंबर रोजी माहूरगड येथून आणलेल्या ज्योतीची भव्य मिरवणूक दुपारी च
४ वाजता होणार असून मंगळवार 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ७ या वेळेत रांगोळी स्पर्धा बुधवार 24 सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता शिव मल्हार पार्टी राहुरी फॅक्टरी यांच्या वतीने जागरण गोंधळ गुरुवार 25 सप्टेंबर रोजी रात्री
९ वाजता कोपरगाव येथील जागरण गोंधळ कार्यक्रम शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता वाकडी येथील जागरण गोंधळ शनिवार 27 सप्टेंबर रोजी रात्री ९ वाजता टाकळीभानकर शिव मल्हार पार्टी यांच्यावतीने जागरण गोंधळ कार्यक्रम रविवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भव्य खुल्या दांडिया सोमवार 29 सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजता भव्य डान्स स्पर्धा मंगळवार 30 सप्टेंबर रोजी रात्री ७.३० वाजता महाआरती बुधवार १ ऑक्टोबर रोजी होम हवन तर गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी आरती होत विजयादशमी पार पडणार आहे.
तरी परिसरातील नागरिकांनी या होणाऱ्या सांस्कृतिक,धार्मिक कार्यक्रमासाठी उपस्थित रहावे असे आवाहन तुळजाभवानी ग्रुप व राजूभाऊ शेटे मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
तर आज येथील चौकास आई तुळजाभवानी चौक असे नामकरण ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत