राहुरी फॅक्टरीतील शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव काळात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने नवरात्र उत्सव काळात विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमांच्या आयोजन

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने यंदाही नवरात्र...

राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील सामाजिक व धार्मिक कार्यात नेहमी अग्रेसर असलेल्या शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने यंदाही नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न होत असून सोमवार 22 सप्टेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता वैष्णवी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व घटस्थापना साई आदर्श मल्टीस्टेट चे संस्थापक अध्यक्ष श्री व सौ शिवाजीराव कपाळे व राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री व सौ संजयजी ठेंगे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.

मंगळवार 23 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता नवरात्र उत्सव सोहळा उद्घाटन समारंभ संपन्न होणार आहेत.

यामध्ये डॉ तनपुरे कारखान्याचे चेअरमन अरुण तनपुरे,आ.हेमंत ओगले, उद्योजक विजय सेठी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, यांच्या शुभहस्ते नवरात्र उत्सव सोहळ्याचे उद्घाटन संपन्न होणार आहे.

तर बुधवार 24 सप्टेंबर रोजी फॅन्सी ड्रेस स्पर्धा सायंकाळी ७ वाजता तर गुरुवार 25 सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता दुर्गा सप्तशती पाठ वाचन व सायंकाळी 9 वाजता नृत्य स्पर्धा पार पडणार आहे.

तर शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शिबिर संपन्न होणार आहे. रात्री ८.३० वाजता देवीचा जागर शनिवार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता होम मिनिस्टर खेळ पैठणीचा सादर करण्यात येणार आहे.

रविवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता स्वरजित संगीत मैफिल ऑर्केस्ट्रा सादर होणार आहेत सोमवार 29 सप्टेंबर रोजी सकाळी ९ते १ या वेळेत वामन हॉस्पिटल व ट्रॉमा सेंटर यांच्या विद्यमाने भव्य सर्व रोग निदान शिबिर संपन्न होणार आहे.रात्री ८.३०वाजता भव्य खुल्या दांडिया महिलांसाठी मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता भव्य खुल्या दांडिया महिलांसाठी बुधवार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता भव्य खुल्या दांडिया महिलांसाठी तर बुधवार २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता विजयादशमी दसरा मूर्ती विसर्जन संपन्न होणार आहे

तरी परिसरातील भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान शांती चौक मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत