राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्री सप्तशृंगी युवा प्रतिष्ठान चालक-मालक संघटना व व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाण...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील श्री सप्तशृंगी युवा प्रतिष्ठान चालक-मालक संघटना व व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो यावर्षी सतराव वर्ष असून यंदाही मोठ्या उत्साहात नवरात्र उत्सव पार पडणार आहे.
यामध्ये सोमवार २२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ ते १२ या वेळेत सप्तशृंगी माता गड वणी येथून आणलेल्या ज्योतीचे पूजन व भव्य मिरवणूक व घटस्थापना करण्यात येणार आहेत.तर मंगळवार 23 सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते १० या वेळेत भजन संध्या जिजामाता महिला भजनी मंडळ यांच्या वतीने करण्यात येणार आहेत. तर बुधवार 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत ह.भ.प बाळकृष्ण महाराज खांदे यांची कीर्तन सेवा तर गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत गायनाचार्य ह.भ.प स्वातीताई हापसे यांची कीर्तन सेवा तर शुक्रवार 26 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत भागवताचार्य ह.भ.प आदिनाथ महाराज हारदे यांचे कीर्तन सेवा तर शनिवार 27 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत आराध्यांचा मेळा कणकावती आराधी मंडळ यांच्या वतीने करण्यात येणार आहे. रविवार 28 सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते ८ या वेळेत गंगागिरी महाराज भारुड मंडळ यांच्यावतीने विनोदी भारुड या ठिकाणी होणार आहे.
तर सोमवार 29 सप्टेंबर रोजी ह.भ.प शिवाजी महाराज शिंदे यांची कीर्तन सेवा तर मंगळवार 30 सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत होम हवन पार पडणार आहे तर बुधवार १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सहा ते ८ या वेळेत ह.भ.प विकास महाराज हापसे यांची कीर्तन सेवा पार पडणार आहेत.तर गुरुवार 2 ऑक्टोबर रोजी विजयादशमी होणार आहे
तर नवरात्रोत्सव काळात दररोज सायंकाळी खिचडी प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन श्री सप्तशृंगी युवा प्रतिष्ठान व चालक-मालक संघटना व व्यापारी असोसिएशन यांच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत