सुवर्णरत्नपीठ मुंबई या संघटनेचे सदस्य जयप्रकाशजी बेदरे यांच्या मातोश्री कै. गं. भा. प्रमिला विष्णूपंत बेदरे यांचे निधन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सुवर्णरत्नपीठ मुंबई या संघटनेचे सदस्य जयप्रकाशजी बेदरे यांच्या मातोश्री कै. गं. भा. प्रमिला विष्णूपंत बेदरे यांचे निधन

(राहुरी/पुणे : श्रेयस लोळगे) उरुळीकांचन ता. हवेली ,जि.पुणे येथील प्रतिष्ठित व्यापारी ,सुवर्णकार समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,सुवर्णरत्न...

(राहुरी/पुणे : श्रेयस लोळगे)

उरुळीकांचन ता. हवेली ,जि.पुणे येथील प्रतिष्ठित व्यापारी ,सुवर्णकार समाजातील जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते,सुवर्णरत्नपीठ मुंबई या संघटनेचे सदस्य जयप्रकाशजी बेदरे यांच्या मातोश्री कै. गं. भा. प्रमिला विष्णूपंत बेदरे (वय ९४) यांचे आज, दिनांक १२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

अंत्यविधी आज सायंकाळी ६ वाजता अमरधाम, अष्टापूर रोड, उरुळीकांचन येथे होणार आहे.

त्यांच्या पश्चात तीन पुत्र, दोन कन्या, सुना, नातवंडे, पणतू असा मोठा परिवार आहे.

राहुरी शहरातील प्रसिद्ध व्यापारी श्री. संजीव सुधाकर उदावंत यांच्या आजी सासू तसेच माजी उपनगराध्यक्ष सौ. सोनाली संजय उदावंत यांच्या आजी होत.

त्यांच्या निधनाने उरुळीकांचन, भांड्याचे अंमळनेर व राहुरी परिसरात शोककळा पसरली आहे.

ईश्वर मृतात्म्यास चिरशांती देवो. 🙏🌸

शोकाकुल –

श्री जयप्रकाश वि. बेदरे

श्री श्रीकृष्ण वि. बेदरे

श्री प्रमोद वि. बेदरे

श्रीमती सुनंदा हनमंतराव जुन्नरकर (पुणे)

श्रीमती रंजना प्रकाश माळवे (नाशिक)

व समस्त बेदरे परिवार – उरुळीकांचन, वाघोली, भांड्याचे अंमळनेर


📍निवासस्थान – आश्रम रोड, उरुळीकांचनसं,

संपर्क : प्रसाद बेदरे-९८२२२११७८९

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत