पीचडी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठीचा लढा सहाव्या दिवशीही सुरूच - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पीचडी विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठीचा लढा सहाव्या दिवशीही सुरूच

पुणे(वेबटीम)  गुडलक चौक, कलाकार कट्टा येथे पीएचडी विद्यार्थ्यांचे फेलोशिपसाठीचे आंदोलन आज सहाव्या दिवशीही सुरू आहे. पावसात भिजत, रात्रंदिवस ...

पुणे(वेबटीम)



 गुडलक चौक, कलाकार कट्टा येथे पीएचडी विद्यार्थ्यांचे फेलोशिपसाठीचे आंदोलन आज सहाव्या दिवशीही सुरू आहे. पावसात भिजत, रात्रंदिवस रस्त्यावर ठाण मांडून बसलेले विद्यार्थी शासनाच्या उदासीनतेविरोधात आवाज बुलंद करत आहेत. आंदोलनात मुलींचाही उत्स्फूर्त सहभाग असून त्या रात्री उशिरापर्यंत रस्त्यावरच ठामपणे बसून आहेत.आज शनिवारी रात्री खा.निलेश लंके यांनी रात्री आंदोलन स्थळी भेट देऊन पाठींबा दर्शविला आहे.



 “आम्ही भिक मागत नाही, आम्ही संशोधनासाठीचा हक्क मागतो आहोत.” २०२३–२४ व २०२४–२५ चे पीचडी विद्यार्थी तात्काळ फेलोशिपस पात्र ठरावेत, नोंदणीपासूनचा कालावधी मोजून फेलोशिप लागू व्हावी,थकीत व प्रलंबित फेलोशिप तातडीने मिळावी, अधिछात्रवृत्तीच्या जाहिराती प्रसिद्ध करून सर्वांना लाभ मिळावा, संशोधन दाबले तर शेतकऱ्यांचे भविष्य, कृषी विज्ञानाचे अस्तित्व आणि समाजाचा विकास धोक्यात येईल, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.


खा.लंके आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांना भेट देत त्यांच्या वेदना ऐकल्या व या लढ्याला पाठिंबा दिला. सरकारने उदासीनता सोडून तात्काळ सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे. अन्यथा या तरुणांचा आक्रोश आणखी प्रखर होईल असे खा.लंके यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत