राहुरी/वेबटीम:- प्रेरणा पतसंस्थेची नववी शाखा देवळाली प्रवरात सुरू होत आहे. शाखेचा उद्घाटन सोहळा विजयादशमी शुभमुहूर्तावर उद्या गुरुवार २ ऑ...
राहुरी/वेबटीम:-
प्रेरणा पतसंस्थेची नववी शाखा देवळाली प्रवरात सुरू होत आहे. शाखेचा उद्घाटन सोहळा विजयादशमी शुभमुहूर्तावर उद्या गुरुवार २ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता देवळाली प्रवरा येथे शांती कॉम्प्लेक्स येथे होणार असल्याची माहिती पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे यांनी दिली.
प्रेरणा पतसंस्थेच्या या शाखेचा शुभारंभ माजी खा. प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते होणार आहे. माजी आ.चंद्रशेखर कदम प्रमुख उपस्थिती आहे.प्रेरणा पतसंस्थेच्या ठेवी सव्वाशे कोटी रुपये असून कर्ज वितरण 77 कोटी रुपये झाले आहे .32 व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या पतसंस्थेचे वीस वर्षांपूर्वी संगणकीकरण झालेले आहे .कोअर बँकिंग ते सर्व बँकिंग सुविधा ब्राह्मणीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत .संस्थेचे मोबाईल ॲप देखील आहे. या सर्व बँकींग सुविधा देवळाली प्रवरा शहरात ल ग्राहकांना उपलब्ध होत आहेत.ग्राहकांची अनेक वर्षांची अडचण आता दूर होणार असल्याचे सुरेश वाबळे यांनी सांगितले.
संस्थेच्या या आधी गुहा ,म्हैसगांव, तांभेरे ,राहुरी ,आंबी व श्रीरामपूर वांबोरी, ब्राह्मणी येथे शाखा आहेत असे व्हा . चेअरमन मच्छिंद्र हुरुळे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत