(राहुरी श्रेयस लोळगे) राहुरी शहरात आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आणि व्यापक वस्तूंच्या श्रेणीसह सुसज्ज असे ‘बालाजी हार्डवेअर आणि प्लायवुड’ या नव...
(राहुरी श्रेयस लोळगे)
राहुरी शहरात आधुनिक सुविधांनी परिपूर्ण आणि व्यापक वस्तूंच्या श्रेणीसह सुसज्ज असे ‘बालाजी हार्डवेअर आणि प्लायवुड’ या नवीन भव्य शोरूमचे उद्घाटन गुरुवार, दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी ११ वाजता वायएमसी ग्राउंड, नगर-मनमाड रोड येथे संपन्न होणार आहे.
या उद्घाटन समारंभाचे शुभहस्ते माजी राज्यमंत्री मा.श्री. प्राजक्तदादा तनपुरे यांच्या हस्ते होणार असून, विविध मान्यवरांची सन्माननीय उपस्थिती लाभणार आहे.
प्रमुख उपस्थिती म्हणून मा.श्री. अरुण साहेब तनपुरे( चेअरमन, डॉ. बाबुराव बाबुजी तनपुरे साखर कारखाना),मा.डॉ. उषाताई तनपुरे(माजी नगराध्यक्षा, राहुरी नगरपरिषद),मा.श्री. हर्षदादा तनपुरे(संचालक, डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे साखर कारखाना),मा.श्री. ताराचंदजी तनपुरे(माजी नगराध्यक्ष राहुरी),मा.डॉ. धनंजयजी पानसंबळ(संचालक, लाईफ इन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राहुरी) हे मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
यावेळी परिसरातील सर्व आर्किटेक्ट, इंजिनीयर, कॉन्ट्रॅक्टर व कारपेंटर बांधवांसह राहुरी तालुक्यातील नागरिकांनी उपस्थिती रहावे अशी विनंती सह्याद्री बेकर्स परिवाराने केली आहे.
हा शोरूम राहुरी शहरातील हार्डवेअर आणि प्लायवुड व्यवसायात नवे मापदंड प्रस्थापित करणार आहे. ग्राहकांसाठी दर्जेदार उत्पादने, उत्कृष्ट सेवा आणि आधुनिकतेचा संगम असलेला हा शोरूम त्यांच्या गरजांना योग्य तो प्रतिसाद देईल, असा विश्वास समस्त सह्याद्री बेकर्स परिवार यांनी व्यक्त केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत