सहकार महर्षी नागवडे साखर कारखाना व संस्थांचा सामाजिक पुढाकार – सेवकांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सहकार महर्षी नागवडे साखर कारखाना व संस्थांचा सामाजिक पुढाकार – सेवकांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी

श्रीगोंदे(गणेश कांबळे)   राज्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाले असून शेतकरी बांधवांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले...

श्रीगोंदे(गणेश कांबळे)



  राज्यात सर्वत्र झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक कुटुंबे बेघर झाले असून शेतकरी बांधवांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.  आज त्यांना मदतीचा हात देण्याची अत्यंत गरज असून एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना,  श्री‌‌. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था, ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था व श्री. तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या सर्व संस्थेतील सर्व सेवकांचा एक दिवसाचा पगार मदत निधी म्हणून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र दादा नागवडे यांनी दिली . 

              राजेंद्रदादा नागवडे पुढे म्हणाले की,  यावर्षी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी ढगफुटी होऊन अतिशय मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे नदीकाठच्या व इतर शेतकऱ्यांच्या पिकांचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.  काही बांधव अक्षरशः बेघर झाल्यामुळे ते उघड्यावर आलेले आहेत.  पशुधन संकटात सापडलेले आहे‌ . त्यांच्या मुला मुलींची शिक्षणाची समस्या गंभीर झालेली आहे. अशावेळी त्यांना मदतीची अत्यंत गरज असल्यामुळे आपण सामाजिक बांधिलकी स्वीकारून मदत करणे गरजेचे आहे. याकरिता सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना, श्री. छत्रपती शिवाजी शिक्षण संस्था,  ज्ञानदीप ग्रामीण विकास शिक्षण संस्था व श्री‌  तुळजाभवानी सेवा प्रतिष्ठान या सर्व संस्थेमधील सर्व सेवकांचा एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्यात येणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले. 

         यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन बाबासाहेब भोस सर्व संचालक मंडळ सदस्य कार्यकारी संचालक प्रवीण शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत