(राहुरी : श्रेयस लोळगे) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहुरी शहर उपखंडाच्या वतीने विजयादशमी निमित्त भव्य शस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राहुरी शहर उपखंडाच्या वतीने विजयादशमी निमित्त भव्य शस्त्रपूजन सोहळ्याचे आयोजन गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.३९ या वेळेत विठ्ठला लॉन्स, नगर-मनमाड रोड, राहुरी येथे करण्यात आले आहे.
या विशेष कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून महेश मधुकर शेळके (उत्तर नगर जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख) मार्गदर्शन करणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून नामदेव भाऊसाहेब वराळे (सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक, बीएस्सी बीएड) हे उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे संयोजन संघचालक अनिल तांबे (राहुरी तालुका) यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.
विजयादशमी हे हिंदू संस्कृतीतील एक पवित्र पर्व असून, पुरुषार्थ, शक्ती व धर्माचे प्रतीक मानले जाते. याच दिवशी राष्ट्रभक्तीने प्रेरित संघाच्या कार्याचा शुभारंभ १९२५ साली झाला होता. यंदाचे वर्ष संघाचे शताब्दी वर्ष असून, "सेवा, समर्पण आणि राष्ट्रनिर्माण" या तत्त्वांवर आधारित शंभर वर्षांच्या कार्याचा गौरव करण्याचे औचित्य या उत्सवातून साधले जाणार आहे.
कार्यक्रमामध्ये शस्त्रपूजन, बौध्दिक, घोष व सांघिक प्रदर्शन यांचा समावेश असून, हिंदू समाजातील सनातन परंपरेचे दर्शन घडवणारा हा सोहळा राहुरीतील नागरिकांसाठी एक प्रेरणादायी पर्वणी ठरणार आहे.
राहुरीतील सर्व संघप्रिय नागरिकांना सहकुटुंब उपस्थित राहून उत्सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तसेच राहुरी तालुक्यातील इतर ९ मंडलांमध्ये हा उत्सव साजरा होणार आहे

कोणत्याही टिप्पण्या नाहीत