(राहुरी : श्रेयस लोळगे) हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणारी श्री दुर्गामाता महादौड उद्या, गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता पा...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
हिंदवी स्वराज्याची प्रेरणा देणारी श्री दुर्गामाता महादौड उद्या, गुरुवार दि. ०२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वाजता पार पडणार आहे. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान व हिंदू ग्रुप, राहुरी तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने ही महादौड आयोजित करण्यात आली आहे.
महादौडचा मार्ग पुढीलप्रमाणे आहे —
खरेदी विक्री संघ – नवी पेठ – शनि चौक – व्यंकटेश चौक – वैजनाथ मंदिर – आझाद चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – शुक्लेश्वर चौक – कानिफनाथ चौक – श्रीराम मंदिर.
या दौडीत शेकडो युवक भगवे झेंडे, पारंपरिक वेशभूषा आणि “जय भवानी, जय शिवाजी” च्या घोषणांसह सहभाग घेणार असून, संपूर्ण राहुरी शहर राष्ट्रभक्तीच्या आणि धर्मप्रेमाच्या उत्साहात न्हालेलं पाहायला मिळणार आहे.
“आपले एक पाऊल, लाखोंना दिशा देईल” या भावनेतून सर्व नागरिकांनी वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राहुरी
🚩 हिंदू ग्रुप – राहुरी तालुका

कोणत्याही टिप्पण्या नाहीत