देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भाग्यशाली कलेक्शन या नामांकित दालनाचा भव्य नूतनीकरण सोहळा आज २ ऑक्टोबर रोजी ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भाग्यशाली कलेक्शन या नामांकित दालनाचा भव्य नूतनीकरण सोहळा आज २ ऑक्टोबर रोजी ४ वाजता विजयादशमी शुभमुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.
या दालनाचे उद्घाटन महंत ह.भ.प. उद्धवजी महाराज मंडळीकर ( मठाधिपती जगतगुरु तुकाराम संस्थान, श्रीक्षेत्र नेवासा) यांच्या शुभहस्ते होणार आहे. तसेच कार्यक्रमाला माजी आमदार चंद्रशेखर कदम पाटील (मा.उपाध्यक्ष, श्रीसाईबाबा विश्वस्त व्यवस्था, शिर्डी) व श्रीमती नंदा शंकरराव लासुरकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन स्मिता व श्री. किरण शंकरराव लासुरकर, शिला व श्री. प्रकाश शंकरराव लासुरकर, कोमल व श्री. सचिन शंकरराव लासुरकर परिवाराच्या वतीने करण्यात आले.
📍स्थळ : भाग्यशाली कलेक्शन, काकासाहेब चौक, देवळाली प्रवरा, ता. राहुरी, जि. अहमदनगर.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत