टाकळीमिया(वेबटीम) राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किशोर मोरे यांची शिवसेना शिंदे गट अध्यात्मिक आघाडीच्या अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुखप...
टाकळीमिया(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील किशोर मोरे यांची शिवसेना शिंदे गट अध्यात्मिक आघाडीच्या अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी निवड करण्यात आली आहे.
शिवसेनाप्रमुख स्वः बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शना नुसार शिवसेना धर्मवीर अध्यात्मिक सेना प्रांत अध्यक्ष ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांच्या सुचनेनुसार अहिल्यानगर जिल्हा संपर्कप्रमुखपदी किशोर मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या नियुक्तीचे पत्र जिल्हाप्रमुख संपत महाराज जाधव यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी गोपाल शिंदे, दत्ता गागरे,विजय तोडमल, संभाजी करपे, विजय लबडे आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत