राहुरी फॅक्टरीत ‘श्रीशा ब्युटी स्टुडिओ अँड क्रिएशन’चे उद्या रविवारी भव्य उद्घाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत ‘श्रीशा ब्युटी स्टुडिओ अँड क्रिएशन’चे उद्या रविवारी भव्य उद्घाटन

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी परिसरातील महिलांसाठी आधुनिक सौंदर्य उपचारांची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्रीशा ब्युटी स्टुडि...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी परिसरातील महिलांसाठी आधुनिक सौंदर्य उपचारांची नवी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ‘श्रीशा ब्युटी स्टुडिओ अँड क्रिएशन’ या अत्याधुनिक ब्युटी पार्लर व क्रिएशन सेंटरचे भव्य उद्घाटन समारंभ रविवार, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.


हा स्टुडिओ श्रीरामपूर रोडलगत आदिनाथ सर्व्हिस स्टेशनसमोर सुरू करण्यात येणार आहे.


 या ठिकाणी फेसियल, हेअर ट्रीटमेंट, मेकअप, मेंहदी, ब्रायडल मेकओव्हर अशा विविध सौंदर्य सेवा तसेच महिलांसाठी खास क्रिएशन विभागही सुरू करण्यात आला आहे.


 तरी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित रहावे असे आवाहन मंगल बबन डोंगरे, प्रियंका संजय डोंगरे, प्रतिभा संतोष डोंगरे, मनीषा कृष्णा डोंगरे यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत