(राहुरी : श्रेयस लोळगे) नामदेव शिंपी समाज संघ, महाराष्ट्रतर्फे दरवर्षी दिला जाणारा "हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार – २०२५...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
नामदेव शिंपी समाज संघ, महाराष्ट्रतर्फे दरवर्षी दिला जाणारा "हुतात्मा हिरवे गुरुजी समाजभूषण पुरस्कार – २०२५" यंदा प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते गोविंद नामदेव यांना जाहीर करण्यात आला आहे. संघाचे अध्यक्ष श्री. सिद्धेजी हिरवे, निलेशजी बोंगाळे, अहिल्यानगर भाजपचे जिल्हा सरसिटणीस नारायण धोंगडे, शुभम डोगमाने आदी पदाधिकाऱ्यांनी गोविंदजींच्या गोरेगाव येथील निवासस्थानी जाऊन त्यांना निवडीचे पत्र प्रदान केले व सन्मानपूर्वक अभिनंदन केले.
या भेटीदरम्यान, समाजभूषण पुरस्काराची पार्श्वभूमी, हुतात्मा हिरवे गुरुजींचे सामाजिक योगदान आणि समाज संघाचे कार्य यावर सखोल चर्चा झाली. गोविंद नामदेव यांनीही आपल्या कष्टमय प्रवासाबद्दल सांगताना, अभिनय क्षेत्रात यश मिळवूनही आपल्या मूळ ओळखीला कायम ठेवले असल्याचे अभिमानाने नमूद केले.
नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे माजी विद्यार्थी असलेल्या गोविंद नामदेव यांनी ‘सत्या’, ‘विरासत’, ‘सरफरोश’, ‘ओह माय गॉड’ अशा १०० हून अधिक चित्रपटांमध्ये प्रभावी भूमिका साकारल्या आहेत. त्यांची खलनायकीची खास शैली आजही रसिकांच्या मनात घर करून आहे. लवकरच आयोजित होणाऱ्या विशेष समारंभात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत