ऊसाला ३५०० रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसतोडणी सुरू होणार नाही – राजेंद्र लोंढे यांचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

ऊसाला ३५०० रुपये दर मिळाल्याशिवाय ऊसतोडणी सुरू होणार नाही – राजेंद्र लोंढे यांचा इशारा

  राहुरी(वेबटीम) चालू गळीत हंगामात येणाऱ्या ऊस तोडणीस प्रति टन ३ हजार ५०० रुपये भाव जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यास ऊस तोडू दिल...

 राहुरी(वेबटीम)



चालू गळीत हंगामात येणाऱ्या ऊस तोडणीस प्रति टन ३ हजार ५०० रुपये भाव जाहीर केल्याशिवाय कोणत्याही साखर कारखान्यास ऊस तोडू दिला जाणार नाही असा इशारा शिवसेना शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र लोंढे    दिला आहे.

प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हंटले की, चालू वर्षी साखर 42 रुपये किलो प्रमाणे चांगला भाव मिळवत आहे व इतर बाय प्रोडक्ट (अल्कोहोल, स्पिरिट,इथेनॉल,मळी,भुसा) चांगल्या भावाने विक्री होऊन प्रति एक टन उसापासून आठ हजार रुपये साखर कारखान्यास मिळतात बाकी सर्व खर्च वजा जाता ऊस उत्पादक शेतकऱ्यास ३ हजार ५०० रुपये प्रति टन दर ऊसास कोणत्याही साखर कारखान्यात देण्यास काही अडचण नाही. 


उसाची एकरी उत्पादनात मोठी घट झालेली असून ऊस उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ झालेली आहे उदाहरणार्थ ऊस बेणे, मशागत, मजुरी, रासायनिक खते, शेणखत या सर्व खर्चामध्ये गेल्या दोन ते तीन वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाली असल्याने याच्यापेक्षा कमी भाव मध्ये शेतकऱ्यास अजिबात परवडत नाही.


 यावर्षी योगायोगाने मे महिन्यात चांगला पाऊस झाला उसाची चांगली वाढ झाली पुढे दीड महिना पावसाने दांडी मारली शेतकऱ्याने रात्रीचा दिवस करून विजेचा गंभीर प्रश्न असूनही या दीड महिन्यात तळ हाताच्या फोडाप्रमाणे ऊस जगवला सोन्यासारखे आलेले पीक वाऱ्यामुळे खाली पडल्यामुळे तो अक्षरशा लोळत आहे .


यामुळे उंदीर लागून प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले .तसेच हुमणी रोगाने मोठ्या प्रमाणात वजनात व उत्पन्नात मोठ्या प्रमाणात घट होणार आहे तसेच अतिवृष्टीमुळे अगोदर बाकी सर्व पिकाचे प्रचंड असे नुकसान झालेले असून आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकरी अधिकच मोडकळीस आलेला आहे.


 लवकरच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शेतकरी सेनेच्या वतीने राज्यातील शेतकरी सेनेचे कार्याध्यक्ष ,प्रदेशाध्यक्ष ,उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ऊस परिषद घेण्यात येणार आहे व पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात येईल असे राजेंद्र लोंढे यांनी म्हंटले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत