पुणे (प्रतिनिधि ) दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील जनसंवाद कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांची ...
पुणे (प्रतिनिधि)
दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी पुणे येथील जनसंवाद कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांची राष्ट्रवादीचे प्रदेश नेते तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी माजी सैनिक सेलचे प्रदेशाध्यक्ष दिपकराजे शिर्के यांनी भेट घेऊन माजी सैनिकांच्या विविध मागण्यांसह अन्य काही प्रश्ना संदर्भात निवेदन सादर करत सविस्तर चर्चा केली. भेटी दरम्यान राष्ट्रवादी माजी सैनिक सेल कडून उपस्थित पदाधिकाऱ्यांच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादांचा अमर जवान स्मृती चिन्ह देऊन सत्कारही करण्यात आला.
याप्रसंगी झालेल्या चर्चेत माजी सैनिकांच्या कल्याणासाठी आणि त्यांच्या विविध समस्यांवर ठोस उपाय योजना करण्याची मागणी सैनिक सेलचे राज्यप्रमुख दिपकराजे शिर्के यांनी केली. यावर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत , मागण्यांबाबत लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. भेटीतील महत्त्वाच्या चर्चेमुळे माजी सैनिकांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, त्यांच्या मागण्यांवर सरकारकडून सकारात्मक पावले उचलली जातील,अशी अपेक्षा राज्यभरातील माजी सैनिकांकडून व्यक्त केली जात आहे.
यात प्रामुख्याने महाराष्ट्रात ज्या ठिकाणी आजी माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय जास्त प्रमाणात राहत आहेत अशा ठिकाणी (CSD) सीएसडी कॅन्टीन सुविधा सुरू करणे, प्रत्येक तालुक्यात (ECHS) ईसीएचएस मार्फत हॉस्पिटल व्हावे, प्रत्येक तालुक्यात ऑनलाईन कामे करण्यासाठी सैनिक सहायता केंद्र निर्माण करणे, तसेच माजी सैनिकांची क्रीडा समिती स्थापन करून सर्व सरकारी शाळेत माजी सैनिकांना क्रीडा शिक्षक अथवा सैनिकी प्रशिक्षक म्हणून नियुक्ती करने जेणे करून माजी सैनिकांना पुन्हा रोजगार / नोकरी मिळेल व विध्यार्थ्यांनाही व्यायाम तसेच खेळाची आवड निर्माण होईल आणि त्याच्यातूनच देश भक्तीची, देशप्रेमाची भावना वाढेल असे निवेदन व प्रस्तावात देण्यात आले आहे.
यावेळी माजी सैनिक सेलचे प्रदेश सरचिटणीस अमित मोहिते, कर्नल साहेबराव शेळके, प्रदेश संपर्क प्रमुख चंद्रकांत गायकवाड, सैनिक सेलचे प्रदेश कार्यकारणी सदस्य ज्ञानेश्वर साखरे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष अजित काटे सुभेदार ठुबे साहेब, वीर पत्नी मुरादे ताई आदींसह राज्यभरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस माजी सैनिक सेलचे प्रदेश, जिल्हा आणि तालुका स्तरावरील शेकडो राष्ट्रवादी पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत