देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक प्रशांत मुसमाडे यांनी काल रविवारी नाशिक येथे शिवसेन...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील राजमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा उद्योजक प्रशांत मुसमाडे यांनी काल रविवारी नाशिक येथे शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केला आहे
प्रशांत मुसमाडे यांची गेल्या काही महिन्यांपासून शिंदे गटाच्या पक्षश्रेष्ठी सोबत चर्चा सूरु होती.
परंतु काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदेशाने शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थित नाशिकमध्ये पार पडलेल्या बैठकीत प्रशांत मुसमाडे यांनी प्रवेश केला आहे. आगामी देवळाली प्रवरा नगरपरिषदच्या निवडूणुकीसाठी संपूर्ण जबाबदारी मुसमाडे यांच्याकडे देण्यात आली असून त्यादृष्टीने कामाला लागण्याचे आदेश देण्यात आले आहे. प्रशांत मुसमाडे यांना शिवसेना पक्षाची जिल्हा पातळीवर संघटनात्मक जबाबदारी लवकरच देण्यात असल्याचे समजते.
यावेळी शिवसेना सचिव राम रेपाळे , संपर्क प्रमुख विलास शिंदे, श्री.,गालपगार,श्री. पाटील साहेब,बाबासाहेब मुसमाडे,विशाल मुसमाडे, पृथ्वीराज मुसमाडे उपस्थित होते.
प्रशांत मुसमाडे हे भाजप तथा कदम गटासोबत होते. मात्र काही महिन्यांपासून ते कदमांपासून दूर झाल्याचे दिसून आले. ऐन निवडणूक तोंडावर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्याने भाजप तथा कदम गटाला मोठा धक्का बसला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत