राहुरी/वेबटीम:- वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणी नुकतीच झाली. यामध्ये राहुरी येथील संतोष चोळके यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली....
राहुरी/वेबटीम:-
वंचित बहुजन आघाडीची जिल्हा कार्यकारणी नुकतीच झाली. यामध्ये राहुरी येथील संतोष चोळके यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. त्यांच्या या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील संतोष चोळके हे गेल्या अनेक वर्षापासून वंचित बहुजन आघाडीमध्ये राहुरी तालुकाध्यक्ष म्हणून सक्रिय कामकाज पाहत आहे. ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संतोष चोळके यांनी तालुक्यात अनेक आंदोलने हाती घेऊन सर्वसामान्य लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला.
वंचित बहुजन आघाडीचे महासचिव किसान चव्हाण यांच्या वतीने नुकतीच अहिल्यानगर उत्तर जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी संतोष चोळके यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली.
संतोष चोळके यांच्या निवडीचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. तसेच राजकीय, सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.
मी ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा एकनिष्ठ कार्यकर्ता आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली मी गोरगरीब व वंचित घटकांना नेहमीच न्याय देण्याचे काम करील. तसेच जिल्हाध्यक्ष पदाच्या माध्यमातून पक्ष बळकटीसाठी जीवाचे रान करील, असे मनोगत यावेळी संतोष चोळके यांनी व्यक्त केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत