देवळाली प्रवरा(वेबटीम) नगरपालिका निवडणूक आचारसंहिता अद्याप जाहीर झालेली नसताना कार्यकर्त्यांच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून वॉर सु...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
नगरपालिका निवडणूक आचारसंहिता अद्याप जाहीर झालेली नसताना कार्यकर्त्यांच सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून वॉर सुरू असताना देवळाली प्रवरातील प्रभाग क्रमांक २मध्ये दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या बैठकीमुळे दोन कुटूंबातील तरुणांत आधी शिवीगाळ तर त्यांचे पर्यावसान थेट हाणामारीत झाल्याची घटना आज १६ ऑक्टोबर रोजी रात्री घडल्याचे समजते. किरकोळ कारणावरून झालेल्या या घटनेत एका तरुणास किरकोळ मार लागल्याने तो जखमी झाल्याचे चर्चेतून कळते.
देवळाली प्रवरातील प्रभाग क्रमांक २ मध्ये स्थानिक नागरिकांची आगामी निवडणूक बाबत मते जाणून घेण्यासाठी बैठक पार पडली.
यानंतर एका कुटूंबातील तरुणाने दुसऱ्या कुटूंबातील तरुणास त्यास फोन करून बैठक का घेतली , काय गरज होती असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.त्यानंतर दुसऱ्या कुटूंबातील तरुणाने शिवीगाळ करू नको, आपण यावर नंतर बोलू असे उत्तर दिले. मात्र तरीही सदर तरुण शिवीगाळ करण्याचे थांबत नव्हता. अखेर हे सर्व राहुरी फॅक्टरी नाका परिसरात एकत्रित आले असता हमरीतुमरी व समोरासमोर शिवीगाळ होऊन हाणामारी झाल्याचे कळते. यामध्ये एका तरुणास मार लागल्याने तो जखमी झाल्याचे समजते. या ठिकाणी तरुणांची मोठी गर्दी दिसून आली.
दरम्यान देवळाली प्रवरातील काही राजकीय मंडळी व सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन हे वाद मिटविले असल्याचे समजते. मात्र दोन कुटूंबात भावी नगरसेवक स्टेट्सवरून झालेल्या हाणामारीची चांगलीच चर्चा असून निवडणूक आधिच वातावरण तापल्याचे दिसून येत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत