(राहुरी श्रेयस लोळगे) व्यंकटेश तरुण मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सव व कोजागिरी पौर्णिमा निमित्त महिलांसाठी एक आगळावेगळा व भव्य असा "न्यू ह...
(राहुरी श्रेयस लोळगे)
व्यंकटेश तरुण मंडळाच्यावतीने नवरात्र उत्सव व कोजागिरी पौर्णिमा निमित्त महिलांसाठी एक आगळावेगळा व भव्य असा "न्यू होम मिनिस्टर – पैठणीचा" हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. मंडळाचे मार्गदर्शक विकास मंडळाचे अध्यक्ष रावसाहेब चाचा तनपुरे तसेच युवा नेते प्रतीक रावसाहेब तनपुरे यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
हा कार्यक्रम उद्या शनिवार, दिनांक ४ ऑक्टोबर २०२५ रोजी, सायंकाळी ७ वाजता, तनपुरे गल्ली, व्यंकटेश चौक, राहुरी येथे पार पडणार आहे. महिलांसाठी खास आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धात्मक कार्यक्रमात प्रथम बक्षीस – फ्रीज, द्वितीय – वॉशिंग मशीन, तृतीय – कुलर, चौथे – स्टँड फॅन, आणि पाचवे – मिक्सर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत.
तसेच, उपस्थित महिलांसाठी लकी ड्रॉद्वारे प्रथम बक्षीस – सायकल, द्वितीय – इंडक्शन शेगडी, तृतीय – दोन इस्त्री, चौथे – दोन मॉब, पाचवे – पाच कपबशी सेट आणि विशेष बक्षीस म्हणून पाच पैठण्या देण्यात येणार आहेत.
राहुरी शहरात महिलांसाठी अशा प्रकारचे भव्य आयोजन प्रथमच होत असून, या कार्यक्रमाला सिने अभिनेता क्रांती नाना मळेगांवकर व बालगायिका, टीव्ही स्टार सह्याद्री मळेगांवकर यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
महिलांनी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन व्यंकटेश तरुण मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत