ताहाराबाद (वार्ताहर) अतिवृष्टीमुळे राज्यात झालेली पूरस्थिती, शेती व्यवस्था कोलमडली असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आह...
ताहाराबाद (वार्ताहर)
अतिवृष्टीमुळे राज्यात झालेली पूरस्थिती, शेती व्यवस्था कोलमडली असून शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक झाली आहे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांने बळीराजाला हातभार लावावा, असे आवाहन श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान समितीचे अध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी केले आहे.
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी श्री संत कवी महिपती महाराज देवस्थानकडून मुख्यमंत्री सहाय्यता निधीस ५१ हजार रुपये देण्यात आले आहे. देवस्थान समितीने हा धनादेश राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी व पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
यावेळी देवस्थानचे अध्यक्ष राजेंद्र साबळे म्हणाले, बळीराजा सुखी तर संपूर्ण प्रजा सुखी. संपूर्ण समाजव्यवस्था शेतीवर अवलंबून आहे.अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला गेला आहे.प्रत्येकाने शेतकऱ्यांसाठी फुलना फुलाची पाकळी म्हणून हातभार लावावा, शेतकरी वर्ग अतिवृष्टीमुळे संकटात असून शेतकऱ्यांचे जीवनमान पूर्वपदावर येण्यासाठी प्रत्येकाने तन-मन-धनाने सिंहाचा नाही, परंतु खारीचा का होईना? वाटा उचलावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी देवस्थानचे ज्येष्ठ विश्वस्त सुरसिंग पवार, रमेश नालकर,अशोक देशमुख,मच्छिंद्र कोहकडे, दत्तात्रय जगताप, सुभाष पाटील, सचिव बाळासाहेब मुसमाडे, सागर झावरे, रामभाऊ कवडे व गौरव तनपुरे आदीं उपस्थित होते.
श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान अवर्षण पट्ट्यात असूनही नेहमी समाजकार्यात अग्रेसर आहे. देवस्थानच्या मदतीबरोबर माझी ही तुटपुंजी मदत म्हणून मी ११ हजार रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देत आहे.
ज्येष्ठ विश्वस्त-मच्छिंद्र कोहकडे. (सर)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत