देवळाली प्रवरा(वेबटीम ) शालेय जीवनातील सुवर्णकाळाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि जुनी मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी मा...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
शालेय जीवनातील सुवर्णकाळाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आणि जुनी मैत्री अधिक घट्ट करण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी माध्यमिक विद्यालय, देवळाली प्रवरा येथील इयत्ता १० वी (२००१ बॅच) च्या माजी विद्यार्थ्यांनी 'ऋणानुबंध २०२५' या नावाने एका अविस्मरणीय स्नेह-संमेलनाचे (गेट-टुगेदर) आयोजन केले होते. हा सोहळा दिनांक २३ ऑक्टोबर २०२५ रोजी शाळेच्या प्रांगणात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाची सुरुवात माजी विद्यार्थ्यांच्या नोंदणी आणि उपस्थित माजी विद्यार्थ्यांच्या स्वागताने झाली. तब्बल २४ वर्षांनंतर एकत्र आलेल्या मित्रांनी एकमेकांना ओळख देऊन ओळख व परिचय करून घेतला आणि सोबत चहापानाचा आनंद लुटला.
कार्यक्रमाचे एक खास आकर्षण म्हणजे फेटे बांधण्याचा कार्यक्रम. श्री. रवींद्र भाऊ गडाख यांनी फेटे बांधण्याची व्यवस्था केली होती, ज्यामुळे कार्यक्रमाला पारंपरिक व मराठमोळा स्पर्श मिळाला.
कार्यक्रमाचे औपचारिक उद्घाटन प्रमुख पाहुणे उपस्थित श्री. साळुंखे सर आणि अन्य मान्यवरांच्या हस्ते झाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी, माजी विद्यार्थी श्री प्रशांत मुसमाडे,प्रीती गोसावी,ज्ञानेश्वर साळुंखे यांनी आपल्या शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करत उपस्थित शिक्षकांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
यावेळी, माजी विद्यार्थ्यांसाठी खास 'वर्ग भरवणे' सत्राचे आयोजन करण्यात आले होते. वर्गात परत बसून अनेकांनी वर्गातील आठवणींना उजाळा दिला.
माजी विद्यार्थ्यांसाठी आठवणी सांगण्याचे खुले सत्र पार पडले, ज्यात अनेक भावनिक आणि मजेदार किस्से सांगण्यात आले.
सर्व माजी विद्यार्थ्यांना भेटवस्तू देऊन हा सोहळा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी माजी विद्यार्थी ग्रुप फोटो व व्हिडियो काढण्यात आले. वातावरणात उत्साह टिकून ठेवण्यासाठी संगीत रजनीचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता..
आपले अनुभव मस्ती सांगत एक दिवस शालेय जीवनाचा आनंद सर्व मित्रांनी लुटला.समारोप, आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता झाली.या स्नेह-संमेलनातून २००१ च्या बॅचने मैत्रीचे जुने 'ऋणानुबंध' अधिक दृढ केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी गोविंद सांबारे, दीपक मुसमाडे, प्रदीप गवांदे, प्रशांत मुसमाडे, डॉ. प्रवीण कोठुळे, दीपक येवले गणेश सांगळे, बाबासाहेब ढूस,अजय जाधव,प्रशांत उंडे,उमाकांत सांगळे, गणेश दळवी, आशिष देसरडा, दीपक वाळके,सोमनाथ वाणी,संजय मालकर यांनी परिश्रम घेतले. मुख्याध्यापक कडूस यांनी सहकार्य केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत