(राहुरी : श्रेयस लोळगे) राहुरी विधानसभेचे आमदार, माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष कै. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या दशक्रिया विधी निमित...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
राहुरी विधानसभेचे आमदार, माजी मंत्री व जिल्हा बँकेचे अध्यक्ष कै. शिवाजीराव कर्डिले साहेब यांच्या दशक्रिया विधी निमित्त रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी राहुरी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राहुरी शहर व्यापारी असोसिएशन तर्फे दिलेल्या माहितीनुसार, दिवंगत नेत्यांना श्रद्धांजली म्हणून शहरातील सर्व व्यापारी दुकाने रविवार, दुपारी १२.०० वाजेपर्यंत बंद राहतील. या काळात सर्व व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तपणे सहकार्य करावे, असे आवाहन राहुरी शहर व्यापारी असोसिएशनच्या वतीने करण्यात आले आहे.
स्व.शिवाजीराव कर्डिले साहेब यांचा दशक्रिया विधी रविवार, दि. २६ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ८:०० वाजता वारूळवाडी रोड, बुऱ्हानगर (कर्डिले साहेबांचे निवासस्थान) येथे आयोजित करण्यात आला आहे.
दिवंगत कर्डिले साहेब यांनी आपल्या कार्यकाळात राहुरी तालुका तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी मोलाचे योगदान दिले होते. त्यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून व्यापाऱ्यांनी शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत