राहुरी फॅक्टरी(वेबटीम) तांभेरे येथे ५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या निवड चाचणीमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज श्री शिवाजीनगर...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
तांभेरे येथे ५ ऑक्टोबर रोजी पार पडलेल्या निवड चाचणीमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज श्री शिवाजीनगर येथील इयत्ता १२ वी विज्ञान शाखेत शिकणारे कार्तिक भाऊसाहेब आरंगळे व सोहम गणेश कदम या विद्यार्थ्यांची सोलापूर या ठिकाणी होणाऱ्या राज्यस्तरीय ज्युनियर बॉल बॅडमिंटन स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे डॉ. बाबुराव बापुजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण तनपुरे, मंडळाचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे, सेक्रेटरी हर्ष दादा तनपुरे, ज्येष्ठ संचालक अरुण ढुस, कृष्णा मुसमाडे, विद्यालयाचे प्राचार्य शिरसाट सर, पर्यवेक्षक श्री. तेलोरे यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
सदर विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक अभयसिंह पाटील यांची मार्गदर्शन लाभले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत