राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरीतील मतदारांना विश्वासात घेणाऱ्या उमेदवारालाच नगराध्यक्ष करा व सर्व समविचारी पक्षांनी एकत्रित येऊन तोड...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरीतील मतदारांना विश्वासात घेणाऱ्या उमेदवारालाच नगराध्यक्ष करा व सर्व समविचारी पक्षांनी एकत्रित येऊन तोडीस तोड उमेदवार निवडावा , यासाठी पक्षाचे जोडे बाजूला ठेवण्याची तयारी दर्शवावी असा सुर राहुरी फॅक्टरी येथील विविध राजकीय पक्ष संघटना संस्था व पदाधिकाऱ्यांची आगामी देवळाली प्रवरा नगरपालिकेच्या दृष्टीने पार पडलेल्या बैठकीत दिसून आला.
कोण काय म्हणाले..👇🏻
चांगल्या व्यक्तीच्या आम्ही सर्व पाठीमागे खंबीरपणे उभे राहू सर्व मिळून जो निर्णय घेतील तो आम्हा सर्वांना मान्य राहील पण एकत्र येणे गरजेचे - विष्णु गीते
राहुरी फॅक्टरीतील मतदारांना विश्वासात घेणाऱ्या उमेदवाराला नगराध्यक्ष करा, अनेक वर्षांपासून राहुरी फॅक्टरी वरील अनेक प्रभागात म्हणावे तसे कामे पूर्णत्वास गेलेले नाहीत आपण सर्व एकत्रित या समविचारी पक्षांना सोबत घेऊन देवळाली प्रवरानगर परिषदेत राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिकांना विचारत घेणाऱ्याच उमेदवाराला नगराध्यक्ष करा- दिपक त्रिभुवन
तोडीस तोड उमेदवार देण्यासाठी नगरपरिषद हद्दीतील नेते मंडळींनी एकत्रित या आम्ही देखील शिवसेना शिंदे पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ अनेक उमेदवार उभे न राहता निवडणूक लढवण्यास सक्षम उमेदवार असतील ते उभे करूया सर्व एकत्रित आल्यास आम्ही सोबत आहोत - प्रशांत मुसमाडे,राजमुद्रा प्रतिष्ठान
सर्व समविचारी एकत्र आल्यास, आमच्या पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून पॅनल तयार करून योग्य ती मदत वरिष्ठ नेत्यांकडून घेऊ व लढाई करू- वैभव गिरमे
राहुरी फॅक्टरीला कायम दुय्यम वागणुक दिली जाते फॅक्टरी परिसरात सर्वाधिक मतदार आहेत समविचारी पक्षांनी पॅनल तयार केल्यास आर्थिक दृष्ट्या सक्षम नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार व नगरसेवकांना उमेदवारी द्या व एकत्र या - माजी उपनगराध्यक्ष भाऊसाहेब पगारे
राहुरी फॅक्टरीचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार उभा करा, मागील अनेक वर्षांपासून एकदा एक संधी वगळता राहुरी फॅक्टरीचा नगराध्यक्ष देवळाली नगरपालिकेत खुर्चीवर बसलेला नाही, राहुरी फॅक्टरीचा नगराध्यक्ष व्हावा यासाठी सर्वांनी एकत्रित यावे व राहुरी फॅक्टरीची ताकद दाखवून द्या - सुनील विश्वासराव
*हे होते बैठकीस उपस्थित*
या बैठकीस साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे,आदर्श नागरी पतसंस्थेचे व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज धनलक्ष्मी उद्योग समूहाचे विष्णुपंत गीते, चारुदत्त पवार, भास्कर कोळसे, तैनूर पठाण,राहुरी अर्बन पतसंस्थेचे चेअरमन प्रशांत काळे,माजी नगरसेवक आदिनाथ कराळे,ज्ञानेश्वर वाणी, गणपत गव्हाणे,सचिन साळवे,बाळासाहेब लोखंडे,राजू साळुंके,धनंजय डोंगरे,नितीन डमाळे, सोमा कीर्तने,अँड.अजय पगारे, डॉ.ऋषिकेश पवार,संतोष धावडे,बाळासाहेब आढाव,गोविंद खवडे, सोमा आहेर,बाळासाहेब पडागळे,अजित येवले, प्रकाश सोनी,राहुल साळुंके,प्रमोद कोळसे,गजानन घुगरकर, वैभव गाडे, प्रितेश तनपुरे,युवराज लहानगे,निखिल गोपाळे,विक्रांत पंडित, मयूर कदम,साई त्रिभुवन, आदींसह राहुरी फॅक्टरी परिसरातील नागरिक उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत