(राहुरी : श्रेयस लोळगे) धर्म, संयम आणि साधनेच्या मार्गावर उत्स्फूर्तपणे वाटचाल करणाऱ्या मुमुक्षू सुश्री सिद्धी अर्चना सचिन बोरा या आपल्या वय...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
धर्म, संयम आणि साधनेच्या मार्गावर उत्स्फूर्तपणे वाटचाल करणाऱ्या मुमुक्षू सुश्री सिद्धी अर्चना सचिन बोरा या आपल्या वयाच्या केवळ २० व्या वर्षी भव्य भगवती महोत्सवात दीक्षा ग्रहण करणार आहेत. हा भव्य समारंभ उद्या सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी देशनोक, राजस्थान येथे पार पडणार असून, प.पू. आचार्य भगवंत १००८ क्षी. रामलालजी म.सा. यांच्या पावन उपस्थितीत आणि सान्निध्यात दीक्षा विधी संपन्न होईल.
दीक्षेपूर्व दिवशी म्हणजे आज, १२ ऑक्टोबर रोजी वरघोडा, अभिनंदन समारंभ, ओघा बंधाई व केशर छाटना यासारखे पारंपरिक धार्मिक विधी भक्तिमय वातावरणात पार पडले. उद्या १३ ऑक्टोबर रोजी महानिष्क्रमण यात्रा, मुंडन आणि मुख्य दीक्षा विधी आयोजित करण्यात आले आहेत.
धर्माची ओढ आणि वैराग्याची तपश्चर्या
दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सिद्धी बोरा यांना आध्यात्मिक जीवनाची ओढ लागली. त्यांनी तब्बल ४ वर्षे सहा महिने वैराग्यकाल पूर्ण करत, याच काळात ५०० किलोमीटरची पायी पदयात्रा केली. याशिवाय, आरोग्यबोहिलाभ, अन्नयन, मुमुक्षू शिबीर यासारख्या धार्मिक शिक्षण कार्यक्रमांत भाग घेऊन, त्यांनी जैन सिद्धांत भूषण, कोविद, विभाकर, मनीषी अशा विविध धार्मिक परीक्षा यशस्वीरित्या उत्तीर्ण केल्या आहेत.
परिवार व पार्श्वभूमी
सिद्धी बोरा या जळगाव येथील स्व. मोहनलाल बोरा व श्रीमती. सुशिलाबाई यांच्या नात असून, राहुरी येथील सुभाष,चंद्रकांत व अशोकलाल चुत्तर यांचीही त्या नात आहेत. तसेच मनोज, महेश, निलेश व कमलेश चुत्तर यांच्या त्या भाची आहे.
त्यांचा हा संयम आणि साधनेचा मार्ग भावी पिढीसाठी प्रेरणास्थान ठरणारा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत