(राहुरी श्रेयस लोळगे) आगामी राहुरी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चार प्रमुख आघाड्यांसह एकूण आठ अपक्ष उमेदवारांनी मिळून तब्बल 12 अर्ज...
आगामी राहुरी नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी चार प्रमुख आघाड्यांसह एकूण आठ अपक्ष उमेदवारांनी मिळून तब्बल 12 अर्ज दाखल होत निवडणूक रंगतदार बनली आहे.
📍राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) यांच्या वतीने माजी मंत्री व आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या जनसेवा मंडळातर्फे भाऊसाहेब मोरे यांनी अर्ज दाखल केला.
त्यांच्या विरोधात
📍भारतीय जनता पक्षाच्या वतीने सुनील पवार यांनी अर्ज दाखल करत थेट मुकाबला स्विकारला आहे.
📍शिवसेना (शिंदे गट) तर्फे ईश्वर नारायण मासरे, तर वंचित बहुजन आघाडी तर्फे बापूसाहेब माळी यांनी आपापली उमेदवारी नोंदवली आहे.
याशिवाय
📍आठ अपक्ष उमेदवारांनी नगराध्यक्षपदासाठी अर्ज सादर केल्याने बहुकोनी लढत निश्चित झाली आहे.
नगराध्यक्षपदाबरोबरच
📍नगरसेवकांच्या 24 जागांसाठी तब्बल 168 अर्ज दाखल झाले असून स्पर्धा चुरशीची झाली आहे.
दरम्यान, महायुतीकडून एकत्रितपणे रिंगणात उतरण्याची शक्यता सध्या मावळलेली दिसते. भाजपा व शिवसेना शिंदे गटाने स्वतंत्ररित्या मैदानात उतरण्याची भूमिका घेतल्याने स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
राहुरीतील निवडणुकीचे वातावरण त्यामुळे अधिक तापू लागले असून पुढील काही दिवसांत उमेदवारांमधील राजकीय हालचालींना वेग येणार, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत