राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्षांच्या पत्नी आशाताई चव्हाण शिवसेनेत - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे शहराध्यक्षांच्या पत्नी आशाताई चव्हाण शिवसेनेत

  देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा  येथे सुरू असलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एकाच क्षणात वातावरण तापवणारी घटना घडली आहे. राष्ट्...

 देवळाली प्रवरा(वेबटीम)



देवळाली प्रवरा  येथे सुरू असलेल्या नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत एकाच क्षणात वातावरण तापवणारी घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष केदारनाथ चव्हाण यांच्या पत्नी आशाताई चव्हाण काँग्रेसतर्फे मैदानात उतरतील, अशी चर्चा रंगात असतानाच त्यांनी अनपेक्षितपणे शिवसेनेचा झेंडा हाती घेत प्रभाग क्र. १ मधून उमेदवारी भरली आहे.



चव्हाण कुटुंबाचा गड मानल्या जाणाऱ्या या प्रभागात आशाताई या एकमेव महिला उमेदवार. प्रभागातील नातीगोती, केदारनाथ चव्हाण यांचे सर्वच समाजांशी असलेले जाळे आणि केदारनाथ चव्हाण यांचा सामाजिक व धार्मिक कार्यातील सहभाग सर्व घटकांनी आशाताई चव्हाण यांची उमेदवारी एकदम ‘गेम चेंजर’ ठरू शकते, अशी जोरदार चर्चा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत