राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी) राहुरी फॅक्टरी येथील प्रतीक जयेश देसर्डा याची रशियामधील एमबीबीएस शिक्षणासाठी निवड झाली आहे. प्रतीकच्या या यशाने प...
राहुरी फॅक्टरी (प्रतिनिधी)
राहुरी फॅक्टरी येथील प्रतीक जयेश देसर्डा याची रशियामधील एमबीबीएस शिक्षणासाठी निवड झाली आहे. प्रतीकच्या या यशाने पंचक्रोशीतील नागरिकांचा अभिमान वाढविला आहे.
जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर प्रतीकने हे यश संपादन केले आहे. काही वर्षांपूर्वी प्रतीकच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते. त्या कठीण परिस्थितीत त्याची आई रचना देसर्डा यांनी धैर्याने कुटुंबाचा सांभाळ करत मुलाच्या शिक्षणाला पाठबळ दिले.
अथक प्रयत्नांनंतर प्रतीकने नीट परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवून रशियातील एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळवला आहे. येत्या ११ नोव्हेंबर २०२५ रोजी तो शिक्षणासाठी रशियास रवाना होणार आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत