देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सत्यजित कदम ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने आपली तयारी सुरू केली आहे. नगराध्यक्ष पदासाठी सत्यजित कदम यांचे नाव पक्षाकडून आधीच जाहीर करण्यात आले असून, आता नगरसेवकपदासाठी इच्छुकांची निवड प्रक्रिया आज संपन्न झाली.
या पार्श्वभूमीवर भाजपच्या वतीने एकूण १० प्रभागांतील तब्बल १२० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती आज संपन्न झाल्या. पक्षनिरीक्षक रवी बोरावके, राजेंद्र गोंदकर यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. त्यांनी प्रत्येक इच्छुकाशी संवाद साधत त्यांच्या सामाजिक कार्याचा, जनसंपर्काचा आणि पक्षनिष्ठेचा सखोल आढावा घेतला.
मुलाखतीदरम्यान माजी आमदार चंद्रशेखर कदम, माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम, प्रीती कदम, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे आदिंसह पक्षाचे ज्येष्ठ,श्रेष्ठ मंडळी उपस्थित होते.
यावेळी अनेक प्रभागात इच्छुक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एकाच उमेदवाराला उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांनी नाराज न होता पक्षाचे काम करावे अशा सूचना यावेळी पक्ष निरीक्षकांनी दिल्या असता इच्छुकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
देवळाली प्रवरा नगरपालिकेत भाजपची तयारी सुरू झाली असून पुढील काही दिवसांत उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत