राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढविणार असून त्यादृष्टीने आज रविवारी सायंकाळी शिवसेना न...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा नगरपरिषद निवडणूक शिवसेना शिंदे गट स्वबळावर लढविणार असून त्यादृष्टीने आज रविवारी सायंकाळी शिवसेना नेते व पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या वेळी गट-तट न करता एकदिलाने सर्वांनी काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी नगराध्यक्ष पदासाठी तसेच नगरसेवक पदासाठी इच्छुकांच्या मुलाखती पार पडल्या प्रसंगी नगराध्यक्ष पद व नगरसेवकाल पदासाठी इच्छुक उमेदवारांची नावे नोंद करण्यात येऊन संवाद साधण्यात आला.नगराध्यक्षपदासाठी बाबासाहेब मुसमाडे, उद्योजक गणेश भांड यांचे नावे समोर आले आहे.
यावेळी अनेक प्रभागात इच्छुक मोठ्या प्रमाणात असल्यामुळे एकाच उमेदवाराला उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे अन्य इच्छुकांनी नाराज न होता पक्षाचे काम करावे अशा सूचना यावेळी पक्ष निरीक्षकांनी दिल्या असता इच्छुकांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
आगामी निवडणुकीत सर्वांनी एक दिलाने काम करण्याचे आवाहन यावेळी माजी खा. सदाशिव लोखंडी यांनी केले.
याप्रसंगी माजी आ.भाऊसाहेब कांबळे, प्रकाश चित्ते, जिल्हाप्रमुख नितीन औताडे, बाबुशेठ टायरवाले, अभिजित पोटे, हिंदू धर्म रक्षक सागर बेग, संजय छल्लारे शेतकरी सेनेचे रवींद्र मोरे, जिल्हा अध्यक्ष राजेंद्र लोंढे, उद्योजक गणेश भांड, उपजिल्हाप्रमुख अण्णा म्हसे, सुनील कराळे,दत्तात्रय गागरे,बाबासाहेब मुसमाडे, किशोर मोरे, लतिका गोपाळे आदिंसह पदाधिकारी उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत