कोपरगाव (नितीन जाधव) राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असून, त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. काल पहाटे शहर...
कोपरगाव (नितीन जाधव)
राज्यात गोवंश हत्या बंदी कायदा लागू असून, त्यानुसार कोपरगाव शहर पोलिसांनी कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. काल पहाटे शहरातील आयेशा कॉलनी, बैलबाजार रोड परिसरात पोलिसांनी छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवलेल्या १३ जनावरांची सुटका केली.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आयेशा कॉलनी परिसरातील एका काटवनात धाड टाकली. तेव्हा तेथे लहान-मोठी तेरा जनावरे निर्दयीपणे बांधून ठेवलेली आढळली. पोलिसांच्या हालचालींचा सुगावा लागताच आरोपींनी घटनास्थळावरून पसार झाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर सोनवणे, पोलिस उपनिरीक्षक दीपक रोठे आणि संदीप सोन्ने यांनी घटनास्थळी भेट दिली.
या जनावरांची एकूण किंमत सुमारे १ लाख १० हजार रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रकरणी कॉन्स्टेबल प्रवीण अंकुश घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपींविरुद्ध कोपरगाव शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत