(राहुरी : श्रेयस लोळगे) शहरातील सोनार गल्ली येथील भैरवनाथ मित्र मंडळ यांच्या वतीने भैरवनाथ जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन कर...
(राहुरी : श्रेयस लोळगे)
शहरातील सोनार गल्ली येथील भैरवनाथ मित्र मंडळ यांच्या वतीने भैरवनाथ जयंतीनिमित्त भव्य धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार, दिनांक १२ नोव्हेंबर २०२५ रोजी श्री संत नरहरी महाराज व भैरवनाथ मंदिर परिसरात या कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे.
कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेनऊ वाजता होणार असून स्वर चैतन्य भजनी मंडळ यांचा भक्तिरसाने ओथंबलेला भजन कार्यक्रम दुपारी साडेबारा वाजेपर्यंत पार पडणार आहे. त्यानंतर दुपारी बारा वाजता भव्य महाआरती होईल.
महाआरतीनंतर सर्व भक्तांसाठी भव्य भंडारा व महाप्रसाद ठेवण्यात आला असून, दुपारी १२.०० ते ३.०० वाजेपर्यंत सर्वांना महाप्रसादाचा लाभ घेता येणार आहे.
भैरवनाथ मित्र मंडळाच्या वतीने सर्व नागरिकांना या धार्मिक सोहळ्यात सहभागी होऊन भक्तीमय वातावरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच, ज्यांना देणगी स्वरूपात योगदान द्यायचे आहे त्यांनी संतोष डहाळे (मो. ९८८१६४४६०९) किंवा मनोज अंबिलवादे (मो. ९७६३४३२४८५) यांच्याशी संपर्क साधावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत