देवळाली प्रवरा (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष, देवळाली प्रवरा यांच्या वतीने उद्या, गुरुवार दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शांताबाई ...
देवळाली प्रवरा (प्रतिनिधी)
भारतीय जनता पक्ष, देवळाली प्रवरा यांच्या वतीने उद्या, गुरुवार दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ९ वाजता शांताबाई मंगल कार्यालय, देवळाली प्रवरा येथे भव्य कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यात पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असून देवळाली प्रवरा नगपरिषद निवडणूक पार्श्वभूमीवर हा मेळावा महत्त्वपूर्ण ठरणार आहे.
या कार्यकर्ता मेळाव्यास सर्व नागरिक व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, देवळाली प्रवरा तर्फे करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत