भाजपाचे माजी आमदार मुरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प) मध्ये प्रवेश - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

भाजपाचे माजी आमदार मुरकुटे राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प) मध्ये प्रवेश

पानेगांव (वार्ताहर):-  नेवासा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे २०१४ साली खातं खोलणारे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दि.६ मुंबई येथे राष्ट्रवा...

पानेगांव (वार्ताहर):-




 नेवासा विधानसभा निवडणुकीत भाजपाचे २०१४ साली खातं खोलणारे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी दि.६ मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उपमुख्यमंत्री अजित  पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. माजी आमदार मुरकुटे यांनी २०१४ ते २०१९ नेवासा विधानसभा मतदारसंघात आपल्या जय हरि नामघोष अंगिकारात आगळा वेगळा उपक्रम राबवत तळागाळापर्यंत सुखदुःखात सामिल होतं विकासाचे कामं त्यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते एकनाथ खडसे,  हरिभाऊ बागडे, गिरीश महाजन, पंकजा मुंडे, दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले आदी मंत्र्यांची जिव्हाळ्याचा संपर्क ठेवत नेवासा तालुक्याचा विकासासाठी रस्ते विविध सरकारी योजना ग्रामीण भागात आणल्या त्यामुळे त्यांची ओळख जय हरि कामदार आमदार म्हणून झाली. पुढं २०१९ च्या निवडणुकीत अपक्ष उमेदवार शंकरराव गडाख यांनी पंचवीस हजार मतांनी मुरकुटे यांचा पराभव केला.

२०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपात प्रवेश केला होता. भाजपच्या ज्या चार विद्यमान आमदारांचा पराभव झाला त्यामध्ये विखे पाटील यांनी भाजपच्या विरोधात काम केले म्हणून आमचा पराभव झाला, असा तक्रारी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांन केल्या त्यामध्ये बाळासाहेब मुरकुटे सह अन्य तिघे  होते.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनात राग धरत जाणिव पुर्वक नेवासा विधानसभा मतदारसंघ शिंदे सेनेला देत बाळासाहेब मुरकुटे यांची कोंडी केली. बाळासाहेब मुरकुटे यांनी बच्चू कडू यांचा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश करत पुन्हा नेवासा विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवली त्यांनी पस्तीस हजार मतं घेतली.

प्रहार जनशक्ती पक्षात उमेदवारी केल्याने त्यांना भाजपाने सहा वर्षासाठी निलंबित केले होते. भारतीय जनता पक्षाने निलंबन रद्द करत पुन्हा भाजपमध्ये समाविष्ट कले परंतु अंतर्गत गटबाजी पाहता बाळासाहेब मुरकुटे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हेच न्याय देवू शकतात म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

यावेळी विधानपरिषद आमदार शिवाजीराव गर्जे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाप्रमुख कपिल पवार, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल फुलसौंदर, सरपंच अशोकराव टेमक, राष्ट्रवादी काँग्रेस नेवासा तालुका उपाध्यक्ष संभाजी जाधव, संदिप पुंड, सुभाष फुलसौंदर सह कार्यकर्ते उपस्थित होते.

- आगामी होवू घातलेल्या नगर पंचायत, नगर पालिका, महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणूकीत तसेच शेतकऱ्यांचे जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी जिल्हाभरात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी काम करणार - माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे 

माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याने नेवासा तालुक्यात पक्षाची ताकत वाढली असून नेवासा नगर पंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक पुर्ण ताकदीने लढवणार - अशोकराव मोरे तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत