कोपरगाव(नितीन जाधव) तालुक्यातील ४० टक्के गॅस ग्राहकांचे बायोमेट्रिक इकेवायसी बाकी आहे. आगामी काही दिवसांत इकेवायसी न केल्यास गॅस पुरवठा बंद ...
कोपरगाव(नितीन जाधव)
तालुक्यातील ४० टक्के गॅस ग्राहकांचे बायोमेट्रिक इकेवायसी बाकी आहे. आगामी काही दिवसांत इकेवायसी न केल्यास गॅस पुरवठा बंद होवू शकतो. कोपरगाव तालुक्यातील एच.पी.चे तीन, भारत आणि इण्डेन असे चार गॅस वितरक आहेत. उज्ज्वला गॅस ग्राहक, घरगुती व व्यावसायिक असे एकुण लाखभर गॅस सिलिंडर ग्राहक आहेत. पैकी ६० टक्के ग्राहकांनी बायोमेट्रिक इकेवायसी केले आहे. दि. १५ नोव्हेंबर पर्यंत उर्वरित ४० टक्के ग्राहकांचे बायोमेट्रिक इकेवायसी करणे शिल्लक आहे. येत्या कांही दिवसांत उज्ज्वला गॅस ग्राहकांसह सर्व घरगुती गॅसचा बायोमेट्रिक केवायसी न झाल्यास गॅस ग्राहकांच्या सिलिंडर पुरवठा बंद होवू शकतो.
घरगुती गॅस कनेक्शनला आपला आधार क्रमांक गॅस वितरकाकडे जोडणी करून घेऊन आपल्या गॅसचा बायोमेट्रिक केवायसी नोव्हेंबर अखेरीस करून घ्यावा. अन्यथा उज्ज्वला योजनेचे अनुदान बंद होऊन सर्व गॅस सुविधा बंद होऊन गॅस सिलेंडर पुरवठा खंडित केला जाऊ शकतो
लक्ष्मण निमसे, व्यवस्थापक, कोपरगांव गॅस कंपनी

कोणत्याही टिप्पण्या नाहीत