राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर व वैष्णवी चौक परिसरात मोकाट डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून त्यामुळे परिसरा...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
राहुरी फॅक्टरी येथील अंबिकानगर व वैष्णवी चौक परिसरात मोकाट डुकरांचा मोठ्या प्रमाणात वावर वाढला असून त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सतत वाढत चाललेल्या या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत देवळाली प्रवरा नगरपरिषदेकडे तात्काळ उपाययोजना राबविण्याची मागणी शेतकरी बांधवांनी निवेदनाद्वारे केली.
शेतकऱ्यांनी म्हटले आहे की, मोकाट डुकरे रात्रीच नव्हे तर दिवसाही शेतात घुसून पिकांची मोठ्या प्रमाणावर हानी करत आहेत. यामुळे शेतीचे नियोजन विस्कळीत होत असून आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. कारखाना कॉलनीत ही मोकाट डुकरांमुळे नागरिक हतबल झाले आहेत.प्रशासनाने तत्काळ योग्य पावले उचलून या समस्येवर नियंत्रण आणावे, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना रामनाथ निवृत्ती वरखडे, प्रभाकर माधव वरखडे, ज्ञानदेव भानुदास शिंदे, शिवाजी शिंदे, सुरेश दोंड, महेंद्र दोंड, सोपान शिंदे, किसन वरखडे, हनुमंत लोहार, राजेंद्र वरखडे, राजेंद्र परदेशी व अविनाश वरखडे आदी शेतकरी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत