राहुरी(वेबटीम) प्रेरणा पतसंस्थेने आर्थिक व्यवहारांसोबत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा जपली आहे. या उपक्रमांपैकी संस्थेची वार्षिक दिन...
राहुरी(वेबटीम)
प्रेरणा पतसंस्थेने आर्थिक व्यवहारांसोबत अनेक सामाजिक उपक्रम राबविण्याची परंपरा जपली आहे. या उपक्रमांपैकी संस्थेची वार्षिक दिनदर्शिका विशेष लोकप्रिय असून महिलांसाठी ती अत्यंत उपयुक्त ठरते, असे प्रतिपादन माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केले.
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्रेरणा अर्थ परिवाराच्या वतीने सभासद, ग्राहक, ठेवीदार व हितचिंतकांसाठी माहितीपूर्ण प्रेरणा अर्थ परिवार 2026 दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली. या दिनदर्शिकेचे लोकार्पण माजी खासदार प्रसाद तनपुरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी प्रेरणा अर्थ परिवाराचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे, प्रेरणा मल्टिस्टेट चेअरमन प्रा. वेणुनाथ लांबे, प्रेरणा पतसंस्था चेअरमन मच्छिंद्र हुरुळे, प्रेरणा सोसायटी चेअरमन अशोक उर्हे, संचालक विष्णुपंत वर्पे, शिवाजी उर्हे, प्रा. विशाल वाबळे, अक्षय ओहळ, गणेश म्हसे, तसेच प्रेरणा मल्टिस्टेट जनरल मॅनेजर अनिल वर्पे, मॅनेजर रविंद्र हिवाळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
लोकार्पण प्रसंगी माजी खासदार प्रसाद तनपुरे म्हणाले की,
“पतसंस्था ही सावकारकीपेक्षा वेगळी असून लोकांकडील बचतीचे पैसे गावातील तरुण, होतकरू व्यावसायिक व उद्योजकांना व्यवसायासाठी आवश्यक भांडवल म्हणून उपलब्ध करून देण्याचे महत्त्वपूर्ण काम करते. प्रेरणा पतसंस्थेची दिनदर्शिका ही संस्थेची माहिती समाजापर्यंत पोहोचविणारे प्रभावी माध्यम आहे. घरातील महिलांना सण-वार, राष्ट्रीय दिनविशेष व उपयोगी माहिती यातून मिळत असल्याने प्रत्येक घरात ती आवर्जून लावली जाते.”
प्रेरणा अर्थ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की,“गेल्या २७ वर्षांपासून प्रेरणा अर्थ परिवार माहितीपूर्ण दिनदर्शिकेचे प्रकाशन करत आहे. यंदाही तिन्ही संस्थांच्या माध्यमातून दिनदर्शिका प्रकाशित झाली असून त्यामुळे जनसंपर्कात वाढ होते. संस्थेने आर्थिक शिस्त, पारदर्शी कारभार आणि कोअर बँकिंग प्रणाली स्वीकारल्यामुळे २२५ कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा ओलांडण्यात यश मिळाले आहे.”
ते पुढे म्हणाले की,“वांबोरी, ब्राम्हणी आणि देवळाली प्रवरा येथे नव्याने सुरू केलेल्या शाखांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रेरणा परिवाराची दिनदर्शिका महिलांसाठी पंचांगाप्रमाणे उपयुक्त ठरते. डिजिटल युगात काळानुरूप बदल आवश्यक असल्याने दरवर्षी दिनदर्शिकेच्या माध्यमातून समाजासमोर जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

कोणत्याही टिप्पण्या नाहीत