श्रीरामपूर/वेबटीम:- सध्याच्या मोबाईल आणि डिजिटल युगात पुस्तक वाचनाची ओढ कमी होत असताना, तब्बल ३ लाख पुस्तके विक्री करून समाजात वाचनसंस्कृतीच...
श्रीरामपूर/वेबटीम:-
सध्याच्या मोबाईल आणि डिजिटल युगात पुस्तक वाचनाची ओढ कमी होत असताना, तब्बल ३ लाख पुस्तके विक्री करून समाजात वाचनसंस्कृतीची नवी लाट निर्माण करणारे ‘सोशल मीडियाचे खरे चाणक्य’ वैभव ढुस यांना महाराष्ट्र गौरवरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
श्रीरामपूर येथे आयोजित कार्यक्रमात आयोजक सुनील पाटील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान झाला. आपल्या प्रभावी सोशल मीडिया रणनीती, सातत्यपूर्ण जनजागृती आणि साहित्यप्रेमी तरुणांना जोडणाऱ्या उपक्रमांमुळे वैभव ढुस यांनी राज्यभरात विशेष ओळख निर्माण केली आहे.
यावेळी बोलताना ढुस म्हणाले की,“पुस्तक प्रेमींचा हा सन्मान आहे. मोबाईलच्या गर्दीतही ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे हे सिद्ध करण्याचा माझा प्रयत्न पुढेही सुरू राहील,” अशी भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाला अनेक साहित्यप्रेमी, युवक, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती लाभली. श्रीरामपूर शहरात हा गौरव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत