राहुरी फॅक्टरी(वेबटीम ) भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचवणारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती आज वैष्णवी चौक येथ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात तळागाळापर्यंत पोहोचवणारे लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे यांची जयंती आज वैष्णवी चौक येथे भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या वतीने अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमास भाजपा चंदाराणी गाडे, पुष्पा दोंड, स्वाती कदम, पूनम कुटे, मीना कुटे, वनिता कदम, मंगल वरखडे, दुर्गा वाळुंज, शीतल दोंड, छबुबाई वाणी, सविता कदम, शीतल पोटे, बेबीताई धुमाळ, सुशीला कदम, अश्विनी कदम, कांचन कदम, रोहिणी कदम, मीना कदम तसेच इतर महिला उपस्थित होत्या.
स्व.मुंडे यांच्या कार्याचा आणि पक्षविस्तारातील त्यांच्या योगदानाचा सन्मानपूर्वक आढावा घेत त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत