मंत्री राधाकृष्ण विखे यांना काळे झेंडे दाखवणार वंचित बहुजन आघाडीचा इशारा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

मंत्री राधाकृष्ण विखे यांना काळे झेंडे दाखवणार वंचित बहुजन आघाडीचा इशारा

देवळाली प्रवरा/वेबटीम:- देवळाली प्रवरा पाटबंधारे उपविभागातील प्रवरा उजवा तट कालवा परिसरात वाढलेल्या झाडे झुडपे त्वरित काढण्यात यावे व तेथील ...

देवळाली प्रवरा/वेबटीम:-

देवळाली प्रवरा पाटबंधारे उपविभागातील प्रवरा उजवा तट कालवा परिसरात वाढलेल्या झाडे झुडपे त्वरित काढण्यात यावे व तेथील साफसफाई व्यवस्थितरित्या व्हावी अन्यथा पाटबंधारे मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना काळे झेंडे दाखवण्यात येईल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष चोळके यांनी निवेदनाद्वारे केला आहे.यासंबंधी निवेदन त्यांनी काल उपकार्यकारी अभियंता श्री. गीते यांना दिले आहे. 


या निवेदनात म्हटले आहे की, सदर मुख्य कालव्यांमध्ये मोठ्या प्रमाणात झाडे झुडपे वाढून वन्य प्राणी त्या ठिकाणी वाढल्या असून ते मानवांवर हल्ला करू शकतात कित्येक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना देखील घडले आहे तीच सतर्कता म्हणून पाटबंधारे विभागाने त्वरित झाडे झुडपे काढून व्यवस्थित रित्या साफसफाई त्या ठिकाणी करावी अशी मागणी यावेळी करण्यात आले आहे.


या निवेदनावर बाळासाहेब जाधव, कमाल भाई शेख, अमजद पठाण, विजय साळवे, आबासाहेब कदम, अभिजीत मुसमाडे, मनीष देठे आदींच्या सह्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत